करमाळा बाजार समितीच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.
शेतमाल खरेदी विक्रीचे नियमन करणेसाठी व बाजार आवारात आवश्यक मुलभूत व पायाभूत सुविधा उभारून शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर मिळवून देण्याकरिता दि बॉम्बे अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट अॅक्ट १९३९ चे कायद्यास अनुसरून करमाळा कृषि उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दि .०१/०६/१९४८ रोजी झालेली आहे. दिनांक १६/१२/१९४७ रोजी स्थापनेची अधिसूचना निघाली होती. दिनांक १८/१२/१९४८ रोजी बाजार समितीचे प्रत्यक्षात कामकाज सुरु झालेले आहे. बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण करमाळा या महसूल तालुक्यापुरते मर्यादित आहे. बाजार समितीच्या जेऊर दुय्यम बाजाराची अधिसूचना दिनांक २१/०७/१९५५ रोजी निघालेली आहे. तसेच केम, जिंती या ठिकाणी उपबाजार स्थापन करणेविषयीची अधिसूचना दिनांक १५/०९/१९८३ व दिनांक ०४/०९/१९८६ रोजी निघालेली आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती करमाळा चे मुख्य बाजार आवार करमाळा येथे असून या ठिकाणी बाजार समितीचे १५.०४ हे.आर इतके स्वमालकीचे बाजार क्षेत्र आहे. तर मुख्य बाजार क्षेत्राव्यतरिक्त दुय्यम बाजार आवार जेऊर येथे ४.33 हे.आर इतके बाजार क्षेत्र आहे.
स्थापना व इतिहास
करमाळा तालुक्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टांनी पिकविलेल्या शेतमालाला विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा या करिता स्वातंत्र्यसैनिक देशभक्त नामदेवरावजी जगताप यांनी अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीची सन १९४८ साली स्थापना केली. मार्केट कमिटी चे पहिले सभापती म्हणून स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर पां.म . तथा आण्णासाहेब जगताप यांनी कामकाज पहिले. करमाळा येथील मुख्य बाजार आवार क्षेत्राकरिता करमाळा -अहिल्यानगर व करमाळा -जामखेड रोड लगत गट नंबर १०४,१०५,१०६ मध्ये जमिनी खरेदी व संपादित केल्या. उपबाजार जेऊर क्षेत्राकरिता करमाळा -शेटफळ रोडलगत १० एकर जमीन संपादित केली. या कामी बाजार समितीचे संस्थापक करमाळा विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांनी अविरत परिश्रम घेतले. देशभक्त आ.नामदेवरावजी जगताप यांनी तब्बल २२ वर्षे बाजार समितीच्या सभापती पदी कामकाज पाहिले. या कारकिर्दीत त्यांनी मार्केट कमिटी मध्ये मुलभूत व पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या यामध्ये वायर फेन्सिंग,रस्ते,विजेचे दिवे,पाणीपुरवठा व्यवस्था, कॅन्टीन, ऑफिस बिल्डींग, कंपाऊंड वॉल, सेलहॉल, स्नानगृह, स्वच्छतागृह, वेअरहाउस, शेतकरी निवास,पोस्ट ऑफिस आदी सुखसोयी निर्माण केल्या. मार्केट यार्ड मध्ये आडत्या, खरेदीदार,तालुका सहकारी खरेदी विक्री संघ इत्यादीनी प्लॉटवर बांधकामे केलेली आहेत. बाजार समितीने राज्य शासनाच्या नोटीफिकेशनद्वारे निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या शेतीमालाचे टप्प्याटप्प्याने नियमन केलेले आहे. करमाळा मार्केट कमिटी अहिल्यानगर, बीड, धाराशिव व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे व मार्केट यार्डामध्ये शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव. मापे व चोवीस तासात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल विक्रीची पट्टी/मोबदला मिळत असल्यामुळे अल्पावधीतच पाच जिल्ह्याच्या सीमेवरील विश्वसनीय बाजार पेठ म्हणून नावलौकिकास आली. करमाळा बाजार समितीमध्ये परराज्यातून देखील खरेदीदार माल खरेदीसाठी येऊ लागले. परंतु बाजार समितीची सन १९८९ साली मा.आ.श्री जयवंतराव नामदेवराव जगताप यांनी बाजार समितीच्या सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगती झाली. श्री.जगताप यांनी शेतमाल विक्रीतून येणाऱ्या मार्केट फी मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून सोयी सुविधा देण्यात येत असलेल्या मर्यादांचा अभ्यास केला व बाजार समितीमध्ये अहिल्यानगर व जामखेड रोड लगत वॉल कंपाऊंड ला लागून तब्बल १५० व्यापारी गाळ्यांची उभारणी केली. यातून शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली व बाजार समितीला शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. तसेच पुढे करमाळा मार्केट यार्ड मध्ये विविध ठिकाणी तब्बल १८ गोदामे, सेल हॉल, धान्य चाळणी यंत्र, १२ गाळे व ३६ ओटेचे सुविधायुक्त भाजी मंडई, सर्व सुविधांनी परिपूर्ण कॅटल मार्केट,रयत भवन, शेतकरी निवास ,यार्ड अंतर्गत डांबरी व सिमेंट कॉंक्रीटीचे रस्ते आदी सुविधा निर्माण केल्या. शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्यास सुलभता यावी यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर ची शाखा मार्केट यार्डमध्ये सुरु केली. सद्या करमाळा मार्केट यार्डमध्ये उडीद,तूर,मुग,ज्वारी.बाजरी,हरभरा, मका आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. अपवाद वगळता करमाळा बाजार समिती नफा/वाढावा मध्ये आहे. मार्केट कमिटीच्या इतिहासात सर्वाधिक काळ तब्बल ३० वर्षे सभापती पदाचा बहुमान विद्यमान सभापती मा.आ.जयवंतराव नामदेवराव जगताप यांचे नावे आहे.
बाजार समिती व्यवस्थापन- सभापती
कृषि उत्पन्न बाजार समिती, करमाळा | |||
---|---|---|---|
सभापती कारकीर्द माहिती | |||
अ. क्र. | सभापतींचे नाव | गाव | कालावधी |
१ | मा.दे.भ.पांडुरंगराव महादेवराव जगताप (माजी आमदार) | करमाळा | ०२/०४/१९४८ ते ०५/११/१९५८ |
२ | मा.अब्दुल रहिमान छोटूमियां उर्फ पंजाब वस्ताद शेख | करमाळा | ०६/११/१९५८ ते २७/०१/१९५९ |
३ | मा.दे.भ.नामदेवराव महादेवराव जगताप (माजी आमदार ) | करमाळा | ०३/०७/१९५९ ते २६/०८/१९८२ |
४ | मा.रमणलाल भाईचंद दोशी | करमाळा | १०/०४/१९८४ ते ०५/०५/१९८७ |
५ | मा.पन्नालाल नारायणदास लुणावत | निंभोरे | १८/०५/१९८७ ते ०५/०६/१९८९ |
६ | मा.जयवंतराव नामदेवराव जगताप (माजी आमदार) | करमाळा | १०/०६/१९८९ ते ०२/१०/२०१८ |
७ | मा. शिवाजी शंकरराव बंडगर | ढोकरी | ०३/१०/२०१८ ते २३/१०/२०२३ |
८ | मा.जयवंतराव नामदेवराव जगताप (माजी आमदार) | करमाळा | २४/१०/२०२४ पासून |
बाजार समिती व्यवस्थापन- सचिव
कृषि उत्पन्न बाजार समिती, करमाळा | ||
---|---|---|
सचिव कारकीर्द माहिती | ||
अ. क्र. | सभापतींचे नाव | कालावधी |
१ | श्री.व्ही.आर तरकसे | १९४८-१९६८ |
२ | श्री.शं.स.पाटणे | १९६८-१९९३ |
३ | श्री.स.शं.तरकसे | १९९३-२००२ |
४ | श्री.अ.ए.शिंदे | २००२-२००८ |
५ | श्री.द.ब.क्षिरसागर | २००८-२०१६ |
६ | श्री.सु.ना.शिंदे | २०१६-२०२१ |
७ | श्री.वि.ब.क्षिरसागर | २०२१ पासून |