बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी यांत्रिक चाळणी मशिन बसविली आहे. यामध्ये शेतकऱ्याने आपला शेतमाल स्वच्छ करुन विकावा हा उद्देश. शेतमालाचे स्वच्छता केल्यामुळे जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यास मिळून ग्राहकांना स्वच्छ माल मिळत आहे. तसेच व्यापाऱ्यांना ही बाहेरच्या बाजारात माल पाठविताना स्वच्छ माल करुन पाठविता येत आहे.